विजय म्हस्के - बुद्धिमान युवा शास्त्रज्ञ


‘आकांक्षांपुढती गगन ठेंगणे’

युवा शास्‍त्रज्ञ विजय म्‍हस्‍केयुवा शास्त्रज्ञ विजय म्हस्के याचा वाढदिवस सिन्नर तालुक्यातील, महामार्गापासून दहा किलोमीटर दूर असणाऱ्या त्याच्या मानोरी गावी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात साजरा झाला, तेव्हा ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळा’चे, संगणक शिक्षण देणारे नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्ते तेथे जमले होते. त्या ठिकाणी आलेल्या अन्य नामवंतांत आमदार डॉ. सुधीर तांबे हेही होते. विजयच्या वाढदिवसाचे असे महत्त्व काय?

विजय म्हस्के हा पंचाहत्तर टक्के अपंग आहे. त्याचा लौकिक, त्याने काही भरीव साधण्याआधीच संगणक जगात पसरला आहे, तो त्याने अपंगत्वावर मात करण्याबाबत दाखवलेल्या जिद्दीमुळे. त्याला अभिनंदनाचा पहिला इमेल आला तो, २०२०मध्ये भारत महासत्ता होईल असे स्वप्न दाखवणाऱ्या माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा. त्यांनी त्याला मेलवर प्रश्न विचारला होता, ‘विजय, तू कोण होणार?’ विजय म्हस्केने उत्तर दिले, ‘मी २०२०मध्ये तुमच्यासारखा शास्त्रज्ञ होणार!’ म्हणून तो झाला युवा शास्त्रज्ञ. अर्थात त्याची संशोधन-पावले त्या दिशेने पडत आहेत.

विजयने ‘रयत शिक्षण संस्थे’च्या मानोरी येथील शाळेतून शालांत परीक्षेत ऐंशी टक्के गुण मिळवले व तो नाशिक विभागात पहिला आला. विजय संगणक शिक्षणासाठी जवळच्या आगासखिंड येथील शताब्दी इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये दाखल झाला. त्याने संगणकाचे प्राथमिक धडे सिन्नरच्या श्री कॉम्प्युटर्स या सचिन रहाणे यांच्या संगणक शाळेत घेतले.

विजयने त्याला शास्त्रज्ञ व्हायचे या जिद्दीने संगणकाशी खेळताना संगणक प्रणाली विकसित केली आहे. रस्त्याने चालताना गाडी किती वेगात चालते, त्या गाडीचे घर्षण किती होते, रस्त्याची झीज किती होते, टायरची झीज किती होते, यावरून त्याची संगणक प्रणाली टायरचे उर्वरित आयुर्मान सांगते. तो त्या संशोधनासाठी पेटंट मिळवण्याच्या प्रयत्नांत आहे.

विजयला दत्तक घेणारे आमदार डॉक्‍टर सुधीर तांबे त्याला सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुधीर तांबे यांनी त्याला शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. तांबे त्याच्यावर वर्षाला पन्नास हजार रुपये खर्च करतात. सिन्नरचे माणिकराव कोकाटे यांनी त्याला पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पासष्ट हजार रुपयांचा लॅपटॉप भेट दिला आहे.

विजय म्हस्के जन्मत: अपंग असल्याने, हा कुडमुड्या शिकून काय उपयोग असा सगळ्यांचा विचार. विजयला उठता-बसता येत नाही, चालण्याची गोष्ट दूरच. त्याला उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यावे लागते. त्याला नीट बोलताही येत नव्हते; बरेच तोतरेपण होते. परंतु सतत सराव व अपार कष्ट करून त्याने त्या उणिवेवर मात केली आहे. त्याचा नाशिकच्या एका कॉलेजने अलिकडेच सत्कार केला. त्यावेळी तो अर्धा तास भाषण करू शकला. तो शाळेत असताना, मुले त्याला काटे टोचायची. दुसऱ्यांवर सतत अवलंबून असणाऱ्या विजयला शाळेत नेणारा माणूस पैसे वाढवून मागू लागला. विजयने त्यावर मात करण्याचा प्रयत्न चालवला आणि त्यात तो यशस्वीही झाला. आता, तो स्वत: जेवण करतो, अंघोळ करतो, केस विंचरतो. त्याला पाणी मात्र पिता येत नाही. त्याला द्रव पदार्थांच्या सेवनासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहवे लागते. त्याला कपड्यांची बटणे लावून द्यावी लागतात.

विजयला त्याचे वडील दामोदर म्हस्के आणि आजोबा पंढरीनाथ पावसे यांची, त्याच्या प्रतिकूलतेवर मात करण्याला मदत झाली. नंतरच्या काळात, सचिन रहाणे, एस.बी. देशमुख यांनी त्याला मदतीचा हात पुढे केला.

'महाराष्ट्र ज्ञान महामंडळा'चे संचालक विवेक सावंत व त्यांच्या पत्नी विजयचे कौतुक करताना दहावीत असताना, विजयचे प्रथम सत्राचे गुण होते चौतीस टक्के. तो त्या अपयशाने अंतर्मुख झाला. त्याने २९ नोव्हेंबर ते १ मार्च या काळात घरात वीज नसताना आजोबांकडून दिवा बनवून घेऊन झपाटल्यासारखा अभ्यास केला आणि ऐंशी टक्के गुणांची कमाई केली. नंतर, त्याने मागे वळून पाहिले नाही. तो शताब्दी इन्स्टिट्युटमध्ये डिप्लोमा इंजिनीयरिंगच्या दुसऱ्या वर्गात पास होणाऱ्या मुलांमध्ये एकटा ‘ऑल क्लिअर’ आहे. मुलींमध्ये अनेक जणींना ते यश मिळाले तर मुलांमध्ये एकट्या विजयला.

विजयची कीर्ती ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळा’चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांच्यापर्यंत पोचली आणि त्यांनी नाशिकहून पुण्याचा प्रवास करत असताना मानोरीला भेट दिली. ते विजयला पाहून अचंबित झाले.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते लॅपटॉप स्वीकारताना विजय म्‍हस्‍के.विजयला संशोधनात सातत्य ठेवायचे आहे. सध्या, तो अंधांकरता ऑडिओ झेरॉक्स मशीन बनवण्यासाठी धडपडत आहे. ऑडिओ झेरॉक्स मशीन बोलू लागले तर अंधांना त्यातील मजकूर कळू शकेल. त्याला अपंगांसाठी रोबोही बनवायचा आहे. तो बंगळुरूला जाऊन इन्फोसिस, सिस्को या आय.टी. कंपन्या पाहून आला आहे. त्याला मानोरी या जन्मगावी आयटी कंपनी सुरू करून त्याच्या जन्मगावाचे ऋण फेडायचे आहे. विजय म्हस्केची निवड एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी होऊ घातली आहे. तो साता समुद्रापार भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी पारपत्र (पासपोर्ट) मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. आकांक्षांपुढती गगन ठेंगणे या उक्तीचा प्रत्यय विजयच्या जीवनकथेतून येतो. मानोरी हे गाव त्याच्यामुळे नवी ओळख धारण करत आहे.               

शंकर बोऱ्हाडे
सारांश, गोसावी नगर,
कॅनॉल रस्ता, जेल रोड,
नासिक रोड, नाशिक  
९२२६५७३७९१
shankarborhade@gmail.com

विजय म्हस्के - ९९२२५६४६९८

लेखी अभिप्राय

Hats off to this young scientist !!!

Kaustubh Dixit14/09/2013

CONGRATULATION VIJAY..............

Best Wishes…23/09/2013

vijay ashich pragati karat raha......

Gadakh sopan28/09/2013

ITs a great Man, Who deserve the sucess. Our aim should be like this but we everybody has to increse the efforts like this. Without giving a resons for failture. So, Dear friend Hats of to You.

Dr. Rahul Patil28/09/2013

अशीच प्रगती करत जा

अतुल माधव तांबे 07/10/2013

Tumcha pragarticha vatchalila Aamchakadun khup khup
Shubhechha...........
Vijay bhau...... asach tumcha vijay ho..... hich
Aamhi AAI Ambemata kade prathana karu....
VIJAY BHAU... Tum aage badho.............
Hum Tumhare sath heeee....

sonu kharde11/10/2013

Good wishesh & Best luck for future.

Sharad Jadhav05/11/2013

KEEP IT UP!!!
AII THE BEST FOR YOUR FUTURE ENDEVOUR!!!

awati vidyadha…18/11/2013

mitra kharch tula salaam ....

shivaji janavle06/12/2013

Abhinandan vijay

Raju ugale06/12/2013

Salute to u ,,,,
god bless u

kunal avhad07/06/2014

Congratulation Vijay, Best of Luck your future

Santosh Dorkade15/09/2014

विजय सर best of luck

हरीश कमलेश मुंदड़ा07/11/2014

Hats off you bhai.....Tumchya jiddila salam......

sandeep bhalerao12/02/2015

Thanx to all dear

vijay Damodhar…30/04/2015

Congratulation VIJAY Asich Uttung Bharari Ghet Ja.

Mhaske R08/06/2015

Vijay mhaske.................. salut

sushil pardeshi 07/09/2015

विजय म्हस्केची प्रेरणादायी कहाणी.

डॉ. उमेश करंबेळकर13/12/2015

खूप छान मित्रा. असेच पुढे चालत रहा. KEEP IT UP! AII THE BEST FOR YOUR BRIGHT FUTURE.

bharat shivra…23/05/2016

Good Wishesh Sir

babasaheb khandekar01/07/2016

Good man

k.d joshi28/08/2016

Good nice sir.

K.D.Joshi 28/08/2016

हार्दिक शुभेच्छा

Shivshahir Vij…22/10/2016

Viju Dada tumche kaam normal vyakti la laajvanare ahe.karan aplyat jar jidd asel tar impossible la possible karu shakato hech tumhi dakhun dile.tumche karya sarv tarunansathi preranadayi ahe.Tumchya ya kaamala manapasun Salaam.ani pudhil vatchali sathi hardik shubhecha

Mangal sangale08/11/2016

Very nice

Best of luck Your Future Life

JAYDIP PADEKAR 20/11/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.